Breaking News

‘सह्याद्री’च्या 8 विद्यार्थ्यांची पाणी फाउंडेशनमध्ये निवड


मसूर,(प्रतिनिधी) : यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुकुंद शिंदे, आशुतोष शिंदे, विशाल लिंगे, विराज पाटील, किरण बुर्ले, तेजस्विनी भिसे, सुप्रिया जंगले व श्‍वेताराणी वडर या आठ विद्यार्थ्यांची पाणी फाउंडेशनमध्ये इनप्लांट ट्र्ेनिंगकरिता तांत्रिक प्रशिक्षक पदासाठी निवड झाली. या महाविद्यालयास फाउंडेशनचे प्रशिक्षण विभागप्रमुख शरद भनगडे, संदेश कारंडे, रवींद्र पोमाणे, अनिकेत खेडकर या प्रतिनिधींनी भेट दिली. निवड प्रक्रिया दोन सत्रामध्ये घेण्यात आली. 

पहिल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक विषयावर तीन मिनिटांचे सादरीकरण केले, यामध्ये विद्यार्थ्यांची सामाजिक विचारसरणी व भाषेवरील प्रभुत्व तपासण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या सत्रात मुलाखतीतून आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.