Breaking News

जामखेड येथे अपघातात एकाचा मृत्यु
जामखेड/प्रतिनिधी
जामखेड येथील खर्डा रस्त्यावरून चाललेल्या ट्रक क्रमांक -झेड 10 टी 1264 हा ट्रक जामखेड वरून खर्डाकडे जात असताना अचानक एक अल्पवयीन मुलगा समोरुन मोटार सायकल वरून येत असतांना विलास मगर यांची समोरासमोर मोटरसायकलच्या धडकेने एक जण ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने हा प्रकार घडला.

यावेळी उपस्थितांनी 108 या रुग्णवाहिकेत फोन केले परंतु ती उशीर आली वेळेवर न आल्याने उपस्थितातील एकाने संजय कोठारी यांना फोन केल्याबरोबर केवळ पाच मिनिटात ते रुग्णवाहिका घेऊन पोहोचले आणि जखमींना दवाखान्यात दाखल केले यामुळे संजय कोठारी यांनी केलेल्या सहकार्यामुळे सर्वांनी त्यांचे कौतुक केल आहे. विलास प्रकाश मगर यास डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर त्याचा मृतदेह कोठारी यांनी खाजगी दवाखान्यातून सरकारी दवाखान्यात आणला त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे आणि वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पुढील तपास बापु गव्हाणे व अजिनाथ बडे करीत आहेत.