Breaking News

जिल्हास्तरीय मॅक्सीमस बॅडमिंटन स्पर्धा उत्साहातनगर । प्रतिनिधी -
श्री. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन संचलित मॅक्सीमस स्पोर्टस् अकॅडमी आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा नगरच्या वाडिया पार्क येथे नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत एकूण 146 खेळाडूंनी सहभाग घेतला.
उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने आयोजित या स्पर्धेमध्ये विविध वयोगटात उत्कृष्ट खेळी करत आभा देशमुख व नचिकेत डाळवाले यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. विजेत्या खेळाडूंना मॅक्सीमस स्पोर्ट्स अकॅडमीचे संदीप जोशी, पल्लवी सेंदाणे, प्रशिक्षक तेजस सर, रोहित शर्मा, उत्कर्षा बोरा व मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे - वयोगट 11 वर्षाखालील  मुले - विजेता - हर्ष कटारिया, उपविजयी - यश धामरे. वयोगट 11  वर्षाखालील  मुली -  विजेता - जुई खरमाळे,उपविजयी लक्ष्मी कराळे. वयोगट 13 वर्षाखालील  मुले - विजेता -  मंगेश एकशिंगे ,उपविजयी - तेजस सुगंधी. वयोगट 13  वर्षाखालील  मुली -  विजेता - अनया अमरे, उपविजयी इंदिरा पाचरणे. वयोगट 15 वर्षाखालील  मुले - विजेता - सुजल भोर, उपविजयी - मंगेश एकशिंगे. वयोगट 15 वर्षाखालील  मुली -  विजेता- आभा देशमुख ,उपविजयी अनया अमरे. वयोगट  17  वर्षाखालील  मुले - विजेता - नचिकेत डाळवाले, उपविजयी - हर्षल जानराव. वयोगट 17 वर्षाखालील  मुली -  विजेता - आभा देशमुख, उपविजयी संजीवनी एकशिंगे. 19 वर्षाखालील  मुले - विजेता - नचिकेत डाळवाले, उपविजयी - ओम कांबळे. 19  वर्षाखालील  मुली - विजेता - आभा देशमुख, उपविजयी संजीवनी एकशिंगे.