Breaking News

संताची संगती अर्धा क्षण जरी असली तरी आयुष्याचे कल्याण होईल : अशोक महाराज शास्त्री ईलग


बुलडाणा,(प्रतिनिधी): संताची संगती अर्धा क्षण जरी असली तरी आपले आयुष्याचे कल्याण होईल असे आपल्या निरुपमात प्रतिपादन ह.भ.प. अशोक महाराज शास्त्री ईलग (अहमदनगर) यांनी येथे केले. येथील श्री. बालाजी सेवा समिती व श्री. बालाजी मंदिर संस्थानच्यावतीने आयोजित ब्रह्मोत्सवाला व्यंकटगिरी येथे 11 डिसेंबर पासून प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत आयोजित कीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प गुंफतांना अशोक महाराज इलग बोलत होते. ‘अर्धक्षण घडता संताजी संगति, तेने होई शांति महत्पाप’’ संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको.. एकनाथ महाराजांच्या अभंग कीर्तन सेवेसाठी घेत त्यांनी संत संगतिचा जीवन जगतांना असणारे महत्व सांगत मनुष्य भौतिक सुखाचे मागे लागून खरी मनःशांति हरवत चालला आहे, असे सांगत कीर्तन कथा महोत्सवातच खरे समाधान आहे तेव्हा असे महोत्सव होने समाजात होने आवश्यक आहे.

अतिशय रम्य असलेल्या श्री बालाजी मंदिराच्या परिसराचे व स्वछतेचे कौतुक केले तसेच मंदिर संस्थानच्या माध्यमातून सुरु असलेल्या गोशाला बघुन त्याना अतिशय प्रसन्न वाटले व अभिमान वाटला, आपल्या धर्मातील लोकांनी धर्माप्रती जागरुक असायला हवे धर्मकार्य करावे, पुरणातील रामायण महाभारतातील उदाहरण देत संताची सज्जनाची संगती ठेवली तर आयुष्य सुखकर होईल हे उपस्थितांच्या लक्षात आणून दिले. जीवन जगण्याची खरी कला सांगण्याची खरी कला फक्त या कीर्तन मंडपातच मिळेल आणि जे मिळेल ते मरेपर्यंत टिकेल.कीर्तनाच्या प्रारंभी भगवान बालाजी व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच श्री. बालाजी सेवा समितीच्यावतीने अध्यक्ष अरुणभाऊ दिवटे यांनी संजय महाराजांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे राजेश पिंगळे, संजय मोगल, ओम शर्मा, दिनकरराव जाधव, अनिल गाढे, संतोष पाटील, किशोर पाटील यांची उपस्थिती होती. कीर्तनाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन विश्‍वस्त संतोष पाटील तसेच आभार प्रदर्शन ह.भ.प. पु. शिवराजजी महाराज यांनी केले.