Breaking News

प्रथमोपचार विषयक जागरूक रहा-डॉ.शेख अर्शद


परळी,(प्रतिनिधी): ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अभिनव विद्यालय परळी येथे संस्थेचे सचिव साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक जीवनरक्षक अंतर्गत जिवन संजीवनी
हा आरोग्य विषयक समुपदेशन संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूंढे पी एम तर प्रमुख तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ अर्शद शेख तसेच प्रमुख अतिथी म्हणून सहशिक्षक खान आय.एम. व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन झाली. 


या कार्यक्रमातून डॉ.अर्शद शेख यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहार या विषयी प्रोजेक्टर च्या माध्यमातून प्रात्यक्षिके करून दाखविले व उत्तम आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी करावे व कोणत्या टाळावे या विषयी मार्गदर्शन केले. तसेच विविध घटना प्रसंगी किंवा अपघात झाल्यावर प्रथमोपचार कसे करावेत यांचे प्रात्यक्षिक स्वत करुन दाखविली व विद्यार्थ्यांकडून करून घेतले. रोगराईचा फैलाव कशा प्रकारे होतो व त्याला आपण स्वतः कसे रोखू शकतो व त्याबाबत काळजी कशी घ्यावी, उपाय काय करावेत हे डॉ. अर्शद शेख यांनी साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगून विद्यार्थ्यांनच्या मनातील विविध आजाराची भीती दूर करून आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता काय करावे याची माहिती दिली.