Breaking News

भिंगारमधून दोन दुचाकींची चोरीनगर । प्रतिनिधी -
भिंगारमधील मोमीनगल्ली येथील राहत्या घरासमोरुन दोन दुचाकींची चोरी झाली. याप्रकरणी रवी कृष्णा नायर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्ह्याची नोंद केली. दि. 3 डिसेंबरला भिंगारमधील मोमीनगल्ली येथे गुलाम दस्तगीर यांच्या घरासमोर हिरो होंडा स्प्लेंडर आणि बजाज पल्सर या अनुक्रमे 1 लाख 10 हजार आणि 2 लाख 10 हजार रुपयांच्या या दुचाकी लावण्यात आल्या होत्या. त्या अज्ञात चोरट्याने लांबविल्या. तपास पोलिस नाईक गोरे करीत आहेत.