Breaking News

वाराणसी-हुबळी एक्सप्रेसवरील दरोड्याचा प्रयत्न फसलाअहमदनगर : दौंड-मनमाड लोहमार्गावर श्रीगोंदेरोड रेल्वेस्टेशनवर वाराणसी-हुबळी गाडीवर दरोड्याचा प्रयत्न झाला; मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तो हाणून पाडला. चोरट्यांनी आपल्याकडील शस्त्र टाकून पलायन केले.

शनिवारी पहाटे ही घटना घडली.
वाराणसी-हुबळी गाडी कोपरगाव स्टेशनवर आल्यानंतर सात ते आठ संशयित गाडीत बसले. ते एकमेकांशी मराठीतूनच बोलत होते. श्रीगोंदेरोड स्टेशनवर ही गा़डी क्राॉसिंगसाठी थांबली, तेव्हा अचनाक त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. तिकीट निरीक्षकांना त्यांच्या या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्यांनी ही माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना दिली. गाडीतील जवानांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. हातात बंदुका असल्याचे पाहून चोरट्यांनी पळ काढला. या गडबडीत एकाची बॅग तेथेच पडली. त्यामध्ये चॉपर, एअर पिस्तुल, दोन मोबाईल सापडले. जवानांनी ते जप्त केले आहेत. चोरटे मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.