Breaking News

... आणि ना. अतुलबाबा भोसले नशीबाने बचावले


सातारा (प्रतिनिधी) - कुमार कुस्ती चाचणी निवड स्पर्धेत जखमी झालेल्या मल्लाची विचारपूस करण्यासाठी दवाखान्याच्या लिफ्टमधून निघालेल्या विठ्ठल रुक्मीणी मंदिराचे प्रमुख भाजपचे अतुलबाबा भोसले यांच्यासह वडिल डॉ. सुरेश भोसले व अन्य एक जण लिफ्टमध्ये अचानक बिघाड होवून झालेल्या अपघातातून शनिवारी सायंकाळी 4.30 च्या दरम्यान नशीबाने बचावले.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा येथे झालेल्या कुमार कुस्ती चाचणी निवण स्पर्धेदरम्यान, कुस्ती खेळताना एक मल्ल जखमी झाला होता. त्याला येथीलच राधिका रोडवरील यशवंत न्यूरो सर्जिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भाजपाचे युवा नेते व विठ्ठल रुक्मीणी मंदिराचे प्रमुख अतुलबाबा भोसले, त्यांचे वडिल डॉ. सुरेश भोसले व एक अन्य असे तिघेजण आले होते. राधिका रोडवरील यशवंत न्यूरो सर्जिकल हॉस्पिटलमध्ये असलेल्या तिसर्‍या मजल्यावर रुग्णांच्या वॉर्डकडे जाण्यासाठी ते लिफ्टमध्ये उभे असताना लिफ्ट पहिल्या मजल्यापर्यंत गेल्यानंतर अचानक लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होवून ती वेगाने तळमजल्यावर आदळली. कुणाला काही कळण्याआधीच झालेल्या या अपघाताने भितीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुदैवाने लिफ्टमधील कोणत्याही व्यक्तीला कसलीही इजा पोहोचली नाही.