Breaking News

ब्राम्हणी येथील बिंगो जुगार अड्डयांवर छापाराहुरी/प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने बिंगो नावाच्या हारजितच्या जुगारावर छापा मारत लोकांकडुन पैसै घेवुन जुगार खेळतांना दोघांना रंगेहाथ पकडले. यांच्याविरोधात 12 (अ) प्रमाणे राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी तालुक्यासह शहरात बिंगो जुगार चालविणार्‍यांनी मोठा कहरच मांडला असुन चार दिवसापुर्वी वांबोरी येथे बिंगो जुगारावर गन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला होता.

या ठिकाणी जुगार खेळवणारे जुगार साहित्य व रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिस पथकाने जप्त केला होता. तोच काल दि.4 रोजी दुपारी 4 वा दरम्यान जिल्हा गुन्हे शाखेपथकातील संतोष शंकर लोढे, राहुल सोलंकी, दत्तात्रय गहाणे, बबन बेरप, गव्हाणे यांनी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ब्राम्हणी गावात बाजारतळावर ग्रामपंचायत गाळ्याच्या आडोशाला लोकंकडून पैसे घेवून त्यांना पैसे देवुन बिंगो नावाचा हारजितीचा जुगार खेळत आहे. अशी खबर मिळाल्याने तालुक्यातील ब्राम्हणी येथील बाजारतळावर ग्रामपंचायत गाळयाच्या आडोशाला पथक गेले असता तेथे संगणकावर बिंगो नावाचा हारजितीचा जुगार खेळताना व खेळवितांना या ठिकाणी छापा टाकुन दोन जुगार्‍यांना पकडले. 

त्यांना नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे 1) सिंधु गयाजी नवले वय वर्ष 38 रा. सोनारनगर कुष्ठधाम अहमदनगर, 2) प्रकाश विजय कांबळे वय वर्ष 32 पाईपलाईन रोड नगर असे नाव सांगितले. या दोघांची झडती घेतली असता त्याच्याकडे बिंगो हारजितीचे जुगार साहित्य, मोबाईल व रोख रक्कम असा 20 हजाराचा मुद्देमाल व रोख 4 हजार रुपयांसह सुमारे 25 हजार 500 चा मुद्देमाल मिळून आला असुन यामध्ये एक संगणक डेल कंपनीचा सिमी, फिलीप्स कंपनीचा मॅनिटर काळे रंगाचा, एक्सपो कंपनीचा किबोर्ड, जिओ कंपनीचा नेट रोटर व केबल असा मुद्देमाल जप्त केला असुन पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अ‍ॅक्ट कायदा कलम प्रमाणे गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. शहरासह तालुक्यासह बिंगो जुगाराने थैमान घातले असुन या बिंगो जुगाराने अनेकांचे संसार उध्दवस्त झाले.

 असुन बिंगो जुगार राहुरी तालुक्यातुन हद्दपार करावा. व नव्यानेच हजर झालेले पोलिस निरिक्षक हनुमंत गाढे यांनी या बिंगो जुगारावर छापेमारी करावी अशी मागणी जोर धरत आहे. बिंगो जुगार तालुक्यातुन हद्दपार करण्यात गाढे हे कितपत यशस्वी होणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.