Breaking News

सातारा पालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदी अविनाश कदम


सातारा (प्रतिनिधी) : सातारा पालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीतून जोरदार चढाओढ सुरू झाली होती. पालिकेत 12 सदस्य असले तरी सत्ताधार्‍यांना कोेंडीत पकडणारा सक्षम सदस्य नसल्याने विरोधकांची ताकत कमी पडत होती. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निर्णय घ्यावा लागणार होता. पालिका वर्तुळात स्विकृत पदासाठी दोन दिग्गज ‘दादां’च्या नावांची चर्चा होती. त्यामुळे स्वीकृत सदस्य पदाची माळ कोणत्या ‘दादा’च्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले होते. अखेर स्वीकृत नगरसेवक पदाची माळ माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांच्या गळ्यात पडली. कदम यांच्या निवडीमुळे नगर विकास आघाडीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.