Breaking News

निधी मंजुरीसाठी भाजप मंत्र्यांकडून 20 टक्के कमीशन !अहमदनगर/प्रतिनिधी

गावातील मंदीर मशिद व स्मशानभुमी मंजूर करण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील एका गावात विनोद तावडे यांच्याकडून निधी देतो. त्यातील 20 टक्के कमीशन द्यावे अशी मागणी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या खाजगी पीएने केली होती. त्यामुळे भाजपच्या कार्यकाळात निधी मंजुरीसाठी मोठे कमीशन मोजले, तरच कोणताही निधी प्राप्त होतो. हे उघड-उघड स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे ताईंसह विनोद तावडे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाखाली खाजगी पीएने निधीच्या नावाखाली दोन लाख रुपये घेतल्याचे आरोप करण्यात आला आहे. पैसे घेऊन देखील निधी प्राप्त न झाल्याने दहिफळे या ग्रामस्थाने भाजपच्या मांत्र्यांचा हा कारनामा उघड केला आहे. अर्थात यात किती तत्थ्य आहे. हे पोलीस यंत्रणा चौकशी करणार आहे.

 मात्र, दहिफळे यांनी काही पुरावे देखील व्हायरल व्हिडिओत सादर केले आहे. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी झाल्यास बड्या नेत्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. इतकेच काय, तर या घटनेत वास्तवता आढळून आली तर, मंत्रीपदाचे राजीनामे द्यावे लागतील. एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपाला सिद्ध करताना त्यांच्या नाकीदम उतरला होता. शेवटी दमानिया यांच्या आरोपाने त्यांना मंत्रीपद सोडावे लागले. तशीच सखोल चौकशी टक्केवारी प्रकरणात झाली, तर नक्कीच यात अनेकांवर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सद्या ज्या तरुणाने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्याच्यावर प्रचंड दबाव आणला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या घटनेचे पुढे काय होईल. याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे मुंडे यांच्यासह विनोद तावडे यांच्या कार्यालयात देखील निधी मंजुरीसाठी 20 टक्के रक्कम वसूल केली जाते. हे या व्हिडीओतून समोर आले आहे. गावच्या विकासासाठी दहिफळे यांनी मुंडे यांच्या कार्यालयात दोन लाख तर तावडे यांच्या कार्यालयात दोन लाख अशा रक्कम दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी केवळ 10 टक्के कमीशन दिल्यामुळे हा निधी मंजूर केला नाही. आणखी 10 टक्के कमीशन दिल्यानंतर निधीच्या यादीत नाव येईल, असे अश्‍वासन देण्यात आले. मात्र, हा सर्व विश्‍वासघात व फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर दिलेल्या पैशाची मागणी करण्यात आली. मात्र, त्यानंतर हाती काहीच आले नाही. त्यामुळे दहिफळे यांनी 2 वर्षे पाठपुरावा करुनही त्यांना अन्यायालया समोरे जावे लागले. त्यामुळे व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दिलेले पैसे परत मिळावे, अन्यथा दोन दिवसात मुंडे यांच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दहिफळे यांनी दिला आहे. आज दुसरा दिवस असला तरी, त्यांच्यावर समर्थकांनी चांगलाच डोळा ठेवला असून तडजोडीचा प्रस्ताव समोर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही झाले तरी याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून चौकशी सुरू झाली आहे. यात काय होते, याकडे संपुर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत.

एसीबीकडून माहिती काढणे सुरू
दहिफळे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी एसीबीने माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी तत्परता दर्शविणार्‍या शाखेने काही व्यक्तींशी संपर्क केला असून घटनेतील वास्तवता जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येणार्‍या काळात याप्रकरणी अचानक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, हे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय क्षेत्रातून मोठ्या हलचाली सुरू झाल्या आहेत.

तडजोडीसाठी हलचाली सुरू..
येणार्‍या काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. हा प्रकार माध्यमांसमोर आला तर भाजपला हे प्रकरण महागात पडेल. त्यामुळे काही जाणकार राजकीय व्यक्तींना तडजोडीचा फंडा समोर आणला आहे. दोन्ही व्यक्ती भाजप प्रणित असून त्यांच्यात समोपचाराने प्रश्‍न मिटविण्याचे काम सद्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे अनेक सपर्कातील व्यक्ती संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याचे संदेश येत आहे.