Breaking News

राज्य कबड्डी स्पर्धेसाठी प्रज्ञा बाबरची निवड

म्हसवड (प्रतिनिधी) : वरकुटे म्हसवड (ता. माण) येथील श्रीशंभू महादेव विद्यालयाची विद्यार्थीनी प्रज्ञा अशोक बाबर हिची मुंबई (दादर) येथे होणार्‍या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनने घेतलेल्या जिल्हास्तरीय किशोरी गट महिला कबड्डी स्पर्धेतून प्रज्ञा हिची निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल तिचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षणाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव संग्रामसिंह उथळे, डॉ. राजेंद्र खाडे, माण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील, बाळासाहेब माने, अंकुश इंगळे सुभाष माने मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव आदींनी तिचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.