Breaking News

नरवणेतील उसतोड कामगाराचा मृत्यूरहिमतपूर (प्रतिनिधी) : रहिमतपूर ते औंध मार्गावर साप रोड फाट्यानजीक शेतातील तोडलेल्या ऊसाच्या मोळ्या ट्रॅक्टर ट्रालीत भरत असताना अनावधानाने उंचावरुन पडल्याने गंभीर जखमी झालेला उस तोड कामगार सहदेव दत्तू चव्हाण (वय 30, रा. नरवणे, ता. माण) हा कराड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झाला. 

या घटनेची नोंद रहिमतपूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक प्रविण गायकवाड करीत आहेत.