Breaking News

ढेबेवाडी विभागातील विद्यार्थ्यांची उज्वल कामगिरी


ढेबेवाडी (प्रतिनिधी) : पाटण येथे झालेल्या यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत ढेबेवाडी विभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी चमकदार कामगिरी केली. या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. पाटण येथे पार पडलेल्या वक्तृत्व स्पर्धेत अनुष्का राजाराम देशमुख (इयत्ता तिसरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसगाव) हिने मोठ्या गटात क्रमांक पटकावला. तालुकास्तरीय सांघिक स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रूवले यांनी पोवाडा गायन, मोठा गट यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

जि. प. प्रा.शाळा उधवनेच्या विद्यार्थ्यांनी बालनाट्य स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. जि.प.प्राथमिक शाळा मान्याचीवाडी यांनी प्रश्‍न मंजुषा स्पर्धा मोठ्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. प्राथमिक शाळा खळे यांनी लोकनृत्य स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. प्राथमिक शाळा ताईगडेवाडी गीतमंच स्पर्धा लहानगटात द्वितीय क्रमांक पटकावला. ढेबेवाडी विभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी तालुकास्तरावर चमकदार कामगिरी केल्याबद्दल मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी- विद्यार्थीनी यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षणविस्तार अधिकारी नितीन जगताप यांनी मार्गदर्शन केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे पंचायत समितीच्या सभापती सौ.उज्वला जाधव, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य प्रतापराव देसाई, गटशिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांनी अभिनंदन केले.