Breaking News

वक्तृत्व ही नेतृत्वाची पहिली पायरी : चव्हाण


कार्वे (प्रतिनिधी) : वक्तृत्व ही नेतृत्वाची पहिली पायरी आहे मात्र नेतृत्व हे फक्त राजकारणात करतात हा चुकीचा समज आहे. आज प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वाची गरज आहे.आपले विचार समोरच्या ला पटवुन देतो तोच खरा वक्ता मानला जातो, असे प्रतिपादन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले. वडगाव हवेली (ता. कराड) येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत यशवंत शिक्षण संस्थेचे यशवंत सांस्कृतिक व्यासपीठातर्फे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व व संत तुकाराम गाथा पाठांतर स्पर्धाचे उदघाटनावेळी ते बोलत होते. 

यावेळी मुंबईचे उद्योगपती हरेंद्र शहा, पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, संस्थेचे सचिव डी. ए. पाटील, अध्यक्ष एम. व्ही. चव्हाण, उपाध्यक्ष ज. रा. लोंढे, सदस्य पी. टी. चव्हाण, डॉ. सुधीर जगताप, जे. के. जगताप, उपसरपंच राजेंद्र थोरात, जे. जे. जगताप, रमण, पाटील, भीमराव पाटील, विलास जगताप, मनोज हुबाले, मुख्याध्यापक जी. बी. देशमाने, व्ही. डी. पाटील, ए. आर. मोरे, के. आर. साठे यांची उपस्थिती होती. अविनाश पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांच्या अंगी विविध कला गुण असतात ते शोधुन त्याना वाव देणे गरजेचे आहे. मुलांच्या समोर थोर महा पुरुषांचे आदर्श ठेवले पाहीजेत. यावेळी हरेंद्र शहा ,डाँ सुधीर जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हरेद्र शहा यांनी मुलांना शैक्षणीक साहित्याचे वाटप केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. पी. पवार यांनी स्वागत केले. व्हि. डी. पाटील व व्ही. एच. कदम यांनी सुत्रसंचलन केले. आभार एस. डी. वेताळ यांनी मानले.