Breaking News

आदर्श प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन नृत्याने सोनई कर मंत्रमुग्ध


सोनई/प्रतिनिधी - श्री. हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ, पानासवाडी संचालित आदर्श विद्या प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन काल मोठ्या आनंदात संपन्न झाले. यावेळीं माजी    खा.तुकाराम गडाख, हभप विजय महाराज पवार, सचिव रविराज गडाख यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक माजी खा. तुकाराम गडाख हे होते.

तर प्रमुख पाहुणे सुरेश गडाख, शिवाशेठ बाफना, दादा होन, शशिकांत लांडे, बापुतात्या शेटे, गोरक्षनाथ जगताप, गोरक्षनाथ गायकवाड, कैलास    आव्हाड, पी.एस.आय.कैलास देशमाने, रसिक भळगट्ट, सोपानराव दरंदरले, विजय खंडागळे, किरण चंदेल, संजय वाघ, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मोठे व्यासपीठ,    आकर्षक प्रकाश, व योग्य नियोजन व संगीताच्या तालावर पावन गणपतीच्या प्रगणात लहान-मोठ्या मुले-मुली यांच्या संगीत गाण्यानं मंत्र मुग्ध झालेच, तसा सोनईकरांनी या    समूहाचा अक्षरशः आनंद लुटला.यावेळी असंख्य हिंदी, मराठी, भाषेतील लोकप्रिय सिने गीताच्या नृत्य सादर करण्यात आली. त्यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यावेळी    सूत्रसंचालन डमाळे, प्रस्ताविक मुख्यध्यापक अनिल दरंदरले यांनी केले