Breaking News

न्हव हा रस्ताच हाय का? नागरिकांना प्रश्‍न; सातारा रहिमतपूर मार्गे वडूजला जाणार्‍या रस्त्याची झाली चाळण


सातारा (अक्षय वायदंडे) : सातारा-रहिमतपूर ते अभेंरी दरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरव्यवस्था झाली असून या रस्त्यावर लाखो खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. रस्त्याची अवस्था पाहता न्हव हा रस्ताच हाय का? असा प्रश्‍न नागरिकांना मधून विचाराला जातोय. 

सध्या सातारा कोरेगाव पुसेगाव मार्गावरील हायवचे सहापदरीकरण कामकाज चालू आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करताना प्रवांसाना धुराळा नाका तोंडात घेत मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे धुरळा आणि प्रवासाचा वेळ वाचण्यासाठी सध्या वाहनचालक, प्रवासी पर्यायी रस्ता म्हणून सातारा रहिमतपूर मार्गाने वडूजकडे जाणार्‍या रस्त्याने प्रवास करतात. 

या रस्त्याची एवढी अवस्था बेकार झाली आहे की रस्त्यात लाखो खड्डे निर्माण झाले आहेत.त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता ते समजत नाहीत. त्यामुळे सध्या चारचाकी दुचाकी चालकांना, प्रवाशांना या रस्त्यावरून प्रवास करतांना मोठी कसरत करावी लागत आहे. साताराहून रहिमतपूर मार्गाने वडूज जाताना येताना प्रवाशांना खड्डे चुकवत मार्ग काढावा लागत आहे. खड्डेयुक्त रस्त्यांनी प्रवास करत असताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चारचाकी, दुचाकीचालक वर्ग, प्रवासी, तसेच नागरिकांनमधून तीव्र संताप व्यक्त होत आहेत. अनेक दुचाकी, चारचाकी चालकांना प्रवाशांना रस्त्यातील खड्ड्यामुळे कंबरदुखीचे त्रास उद्भवले आहेत. तसेच या रस्त्यामध्ये लाखो खड्डे असल्यामुळे सध्या हा रस्ता अपघाताला आमत्रंण देेत आहे. रस्त्याची अवस्था पाहता गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था करत आहेत. मात्र, आजपर्यंत सार्वजिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या रस्त्यावरुन कसा प्रवास करायचा हा प्रश्‍न सामान्य नागरिक, वाहनचालकांना पडला आहे. 

सार्वजिनक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष 


गेल्या अनेक दिवसापासून सातारा ते रहिमतपूर वडूज मार्गावर असलेल्या गावातील ग्रामस्थ या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत आहेत मात्र आतापर्यंत सार्वजिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही त्यामुळे या रस्त्याचे दुरुवस्थेकडे सार्वजिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

डिसेंबर अखेर खड्डा दाखवा आणि एक हजार मिळवा पटर्नचा नुसताच बोलबाला 
राज्याचे महसूलंत्री व सार्वजिक बांधकाम मंत्री चद्रकांत पाटील हे म्हणाले होते की डिसेंबर अखेर राज्यातील रस्त्यावर खड्डा दाखवा आणि एक हजार मिळवा, मात्र ते फक्त आश्‍वसनाची खैरात असून त्यावर अद्याप कुठे कोणी खड्डा दाखवला आणि त्याला एक हजार मिळाले असे घडल्याचे दिसून येत नाही. हजारा रुपयाचे सोडा हो मात्र रस्ता तरी खड्डेमुक्त करावा ऐवढीच अपेक्षा नागरिकांनंंधून होत आहे. मात्र चंद्रकांत दादा पाटील यांना हे खड्डे का दिसत नाहीत नक्की त्यांची गाडी कोणती आहे की तिला हे खड्डे जाणवत नाहीत असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होतोय