Breaking News

कोकराळेत जलसंधारणाचे काम सुरु


भोसरे (प्रतिनिधी) - पाणी फौंडेशनमध्ये खटाव तालुक्यातील सहभागी कोकराळे गावात जलसंधारणाच्या कामास ग्रामस्थांनच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. कोकराळेच्या सरपंच नजमा मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य मनोज सावंत, चेअरमन संतोष जाधव यांच्या हस्ते या कामाचे उदघाटन करण्यात आले. 

यावेळी कृषी अधिकारी विजय काळे, श्री. ठोंबरे, अशोक बोबडे, गणेश सावंत, मनोज पाटील, अनिल दुर्गाळे, माजी उपसरपंच विनायक जाधव, पांडूरंग जाधव, ज्ञानदेव सावंत, आप्पा सावंत, विकास पाटील, सागर सावंत, सचिन हराळे, सुधिर सावंत, गणेश सुर्यनगर, हरी पाटील, शिवाजी गायकवाड, नवनाथ सावंत, शामराव सावंत, नवनाथ गायकवाड, संग्राम सावंत, जहीर हराळे, सुमित सावंत, तानाजी हराळे, विकी सावंत आदि उपस्थित होते. यावेळी संतोष जाधव म्हणाले की, कोकराळेसह भोसरे, जायगाव, लोणी या गावांच्या जलसंधारणाच्या कामासाठी आपण पाठपुरावा केला होता, पाठपुराव्यानंतर आ. गोरे यांनी आमदार फंडातून 5 लाख निधी मंजूर केला आहे. मंजूर झालेल्या या निधीतून सलग समतल चर, खोल समतल चर, ओढा खोलीकरण, रुंदीकरण आदी जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहे.