Breaking News

तरुणांनी वारकरी संप्रदायाकडे वळावे : हभप पायगुडे

वाठार स्टेशन (प्रतिनिधी) : समर्थ भगवान वाग्देव महाराज समाधी सोहळ्यातील तिसर्‍या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या हभप संतोष महाराज पायगुडे यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक व श्रोतेजण मंत्रमुग्ध झाले. तरुणांनी जगातील सर्वांत श्रेष्ठ असणार्‍या वारकरी संप्रदायाकडे वळावे आणि आपले जीवन सफल करावे. आज मोबाईलने तरुण पिढी संपूर्णपणे भरकटलेली आहे. 

यावर एकच रामबाण औषध म्हणजे तरुणांनी वारकरी संप्रदायाकडे आपला वाढता कल ठेवला पाहिजे, असेही या वेळी हभप पायगुडे यांनी या वेळी सांगितले. समर्थ वाग्देव महाराज मंदिराच्या भव्य प्रांगणात शेकडो भाविक भक्तांच्या व श्रोत्यांच्या उपस्थितीत हभप संतोष महाराज पायगुडे यांनी अनेक वेगवेगळे दृष्टांत सांगून श्रोत्यांची मने जिंकली. तसेच या वाग्देव महाराज समाधी सोहळा व 83 व्या पुण्यतिथीमुळे वाठार स्टेशननगरीतील वातावरण भक्तिमय झाले आहे.