Breaking News

सुरेश कलमाडी हॉस्पिटलमध्ये दाखल

सुरेश कलमाडी साठी इमेज परिणाम


पुणे : पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रविवारी दुपारी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. चक्कर येऊन पडल्याने कलमाडी यांना रुबी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या मेंदुमध्ये रक्ताची गाठ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. न्यूरोलॉजी विभागातून त्यांना सहाव्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 
सुरेश कलमाडी बर्‍याच कालावधीपासून राजकारणापासून दूर आहेत. कुठल्याही कार्यक्रमात आणि समारंभात ते दिसून आलेले नाहीत. राष्ट्रकुल घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने कलमाडींना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. पण पुणे लोकसभा मतदारसंघातून कलमाडींना उमेदवारी देण्याची चर्चा होती. काँग्रेसकडून त्यांचे निलंबन मागे घेतलेे जाण्याचे संकेत होते.