Breaking News

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये मोठी गुणवत्ता - विखे


राहुरी/प्रतिनिधी
ग्रामिण भागातील विद्यार्थ्यामध्ये मोठी गुणवत्ता असून संधी मिळाल्यास ते निश्‍चितच यशाचे शिखर गाठतात असा विश्‍वास धनश्री विखे यांनी व्यक्त केला. राहुरी येथे डॉ. नयन तारडे यांच्या साईधाम सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनीकचा शुभारंभ करतांना त्या बोलत होत्या.

प्रारंभी केंदळ बु चे माजी सरपंच गोरक्षनाथ तारडे यांनी स्वागत केले. तर शिवाजी गाडे यांनी प्रास्ताविक केले. धनश्री विखे म्हणाल्या की, ग्रामिण भागात शैक्षणिक सुविधांचा अभाव असतांनाही केवळ गुणवत्ता व प्रतिभेच्या जोरावर अनेक मुला-मुलींनी यश मिळविल्याची अनेक उदाहरणे आहेत. अलिकडील काळात शिक्षणाचे महत्व पालकांना समजल्याने ग्रामिण भागातील मुला-मुलींना उच्च शिक्षणाची संधी मिळत आहे. केंदळ सारख्या लहान गावातील शेतकरी कुटुंबातील नयन तारडे हिने बी.डी.एसचा अभ्यासक्रम पुर्ण करून वैद्यकिय क्षेत्रात टाकलेले पाऊल कौतुकास्पद आहे. याचा इतर मुलींनी आदर्श घ्यावा. असे आवाहन धनश्री विखे यांनी केले. कार्यक्रमास जि. प. सदस्य शिवाजीराजे गाडे, डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक नामदेव ढोकणे, सुरसिंग पवार, शिवाजी सयाजी गाडे, अशोक खुरूद, उत्तमराव आढाव, रविन्द्र म्हसे, नंदकुमार डोळस, पार्वती तारडे, उत्तमराव म्हसे, अ‍ॅड. तानाजीराव धसाळ, ज्ञानेश्‍वर विखे, डॉ. स्वप्नील माने, डॉ.भंडारी, प्रमोद तारडे, भिमराज चव्हाण, बाळासाहेब आढाव, अण्णासाहेब देवरे, जालिन्द्र म्हसे, अरूण डोंगरे, प्रभाकर तारडे, नंदकुमार तारडे, अच्युत बोरकर, अमोल तारडे, नवनाथ तारडे, प्रशांत तारडे आदी उपस्थित होते.