Breaking News

उसाच्या फडात तोडकर्‍यांची धांदल - उसतोडणीत मजूर मग्न; ऊस वाहतूक करणार्‍या टॅ्रक्टरसह बैलगाड्यांची भिरकीट


सातारा (अक्षय वायदंडे यांजकडून) : सध्या जिल्हातील बहूतांश भागात उसतोडीना सुरुवात झाली असून उसाच्या फडात कोयत्यांचा खणखणाट वाढला आहे. दरम्यान तोडलेला उस कारखांन्याकडे नेण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रक व बैलगाड्यासह वाहनांची भिरकीट शेताचे शिवार आणि कारखांन्याच्या कार्यक्षेत्रात सुरु झाली आहे. खटाव माण, कोरेगाव कराड तालुक्यात सध्या ऊस तोडणीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी उस टोळी कामगार दाखल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या टोळीतील ऊस मंजूर कामगार उसाच्या फडात उस तोडणी करण्यात मग आहेत. शेळ्या, मेंढ्यांसह पहाटे 4 ते 5 वाजल्यापासून उसतोड मजूरांचा उस शेताच्या शिवारात गलबलाट सुरु आहे. उस वाहतूक करण्यासाठी कारखाना परिसरात टॅ्रक्टर, ट्रक, बैलगाड्यांची रेलचेल सुरु झाली आहे. उसतोड मजूर कामगार जोमाने उसतोड करत असून कारखान्यांच्या आवारात उस घेवून आलेल्या वाहनांचेया रांगा लागत असल्याचे चित्र अनेक साखर कारखाना परिसरात दिसून येत आहेत. उसतोड मजूरांनी आपली कुशलता दाखवत उसतोडीला जोर लावण्याने उसाचे कांडक पाडण्यासाठी कोयत्यांचे सपासप वार होवू लागले आहेत. सर्वच ऊस तोडकरी भल्या पहाटे ऊस तोडणीला प्रारंभ करुन दुपारपर्यंत सुमारे 15 ते 20 ऊस तोडत आहेत. तसेच दुपारपासून पुढेही सायंकाळी तोडणीसाठी सपाटा लावत आहेत. 

ऊसतोड मजूरांना लहान मुले असतात. मात्र त्या मुलांना ते पूर्णवेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे मजूर माता पिता आपल्या तान्ह्या मुलाला शेताच्या बांधावर असलेल्या झाडाला साड्यांचा झोपाळा बांधून त्यात ठेवत आहेत. 


गावापासून दूर राहून करावं लागतयं काम...

बीड, उत्सानाबाद, सोलापूर, लातूर, अहमदनगर आदि जिल्हातून ऊसतोड कामगार हे सातारा जिल्हातील विविध तालुक्यात येतात. कामाला आल्यानंतर ते सहा महिने घरी जात नाहीत.