Breaking News

पत्रकारांनी अपटेड राहणे गरजेचे : सारंग पाटीलकराड (प्रतिनिधी) : डिजीटल मिडियांमध्ये दररोज नवनविन बदल होत आहेत. त्यामुळे पत्रकारांनी या बदलांबरोबरच स्वतःला अपटेड करणेही गरजेचे आहे. कारण सोशल मिडियांचा वापर करून सूक्ष्मपणाने काम 21 व्या शतकात गरजेचे आहे, असे मत सनबीम शिक्षण समूहाचे प्रमुख सारंग पाटील यांनी व्यक्त केले.
येथील सनबीम शिक्षण व उद्योगसमूह आणि श्रीनिवास पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी डिजीटल कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी सनबीमचे सारंग पाटील, पत्रकार सतीश मोरे, पत्रकार देवदास मुळे, गोरख तावरे, सचिन देशमुख, विकास भोसले, खंडू इंगळे, प्रमोद तोडकर यांच्या हस्ते डिजीटल दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी कराड परिसरातील सर्व प्रमुख पत्रकारांसह सनबीम समूहाचे अनिल गावंडे, दादासाहेब नांगरे व कर्मचारी   उपस्थित होते.
यावेळी स्टर्लिर्ंग सिस्टिमचे सीईओ संचालक सतीश पवार यांनी डिजीटल मिडीया कसा गरजेचा असून ट्विटर कसे वापरावे हे सविस्तपणे सांगितले. स्वागत प्रशांत लाड यांनी केले.