Breaking News

कोडोली येथून दुचाकी चोरी


सातारा (प्रतिनिधी) : कोडोली येथील अजिंक्य रेसिडेंन्सी येथे अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. 

याबाबत पोलिस स्टेशन मधून मिळालेली अधिक माहीती अशी की 13 जानेवारी रोजी सरजितसिंग बगाराम रायजी (वय 55, रा. धनगरवाडी) यांची 15 हजार रुपये किंमतीची असलेली काळ्या रंगाची हिरो होंडा शाईन (एमएच 11 बीएम 7003) मोटार साईकल कोडोली येथील अंजिक्य रेसीडेंन्सी येथे पार्क केली होती. त्यावेळी रात्री 9 वाजता अज्ञात व्यक्तीने ही मोटार साईकल चोरी केल्याचे निर्दशनास आले आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.