Breaking News

किन्होळा परिसरातील शेतकर्‍यांना सिंचनाचा लाभ होणार : आ.बोंद्रे


चिखली,(प्रतिनिधी): नदी नाला खोलीकरण, गाव तलाव दुरूस्ती व सिमेंट नाला बांधच्या कामामुळे किन्होळा परिसरातील शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीसाठी मोठा फायदा होणार असून या कामाचा या शेतकर्‍यांना चांगला उपयोग घ्यावा. आपल्या शेतांना या कामामुळे होणारी संरक्षीत सिंचनाची सोय पाहता, आपल्या शेतीतील उत्पादन जास्तीत जास्त वाढवुन शेती फायदयाची करण्यासाठी मेहनत घ्यावी, असे उद्गार आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी जलयुक्त शिवार अंतर्गत किन्होळा येथील सुमारे 55 लक्ष रूपये विविध 37 कामांचे भुमीपुजन प्रसंगी बोलतांना काढले. 

चिखली मतदार संघातील किन्होळा परीसरात सिमेंट नाला व माती नाला बांध खोलीकरणाचे 27 कामे किमंत 6.90 लक्ष रूपयेे, तर दोन सिमेंट नाला बांध 24 लक्ष रूपये, 6 रिचार्ज झापर 3.75 लक्ष रूपये, आणी दोन केटिवेअर व गाव तलाव दुरूस्ती किमंत 20 लक्ष रूपये अशी एकुण 55 लक्ष रूपयाची कामे दिनांक 16 जानेवारी रोजी चिखलीचे आमदार राहुलभाउ बोंद्रे यांचे हस्ते भुमीपुजन करून प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली आहे. किन्होळा येथे या कामाचे मोठया थाटात आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या हस्ते भुमीपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. सुमित्राबाई बाहेकर, प्रभुकाका बाहेकर, तालुका कॉगे्रसचे उपाध्यक्ष दत्तात्रय बाहेकर, शेख ताहेर भाई, नंदु पाटील, आशरद भाई, संजुकाका बाहेकर, मधुकर हिंगे, कापडसिंग पाटील, युनूसभाई, अशोकसिंग राजपुत, शेख आरिफ, जमीरखॉ पठाण, सुनिल बाहेकर, अनिल बाहेकर, गजानन बाहेकर यांच्या कृषी अधिकारी सुरडकर व डुकरे व मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.