Breaking News

लोकनायक’ विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण


कर्जत/प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला. पंचायत समिती सदस्य हेमंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मेघराज बजाज, गणेश करे, अमृता वाघमारे, चंद्रकांत चेडे, बाळासाहेब मोरे, आण्णासाहेब मोरे, मारुती सायकर, सुरेश पवार, सतीश मोरे, निलेश निकम, विजय सोनवणे, प्रशांत आगवण, संभाजी मोरे, कुमार कापसे, सोमनाथ वाघमारे, अक्षय वाघमारे, सुनील खराडे, दादा काळे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मारुती सायकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. मेघराज बजाज, गणेश करे पाटील यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयामध्ये घेतलेल्या क्रीडा, वक्तृत्व, निबंध, रांगोळी आदी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

सूत्रसंचालन प्रा. किरण जगताप, गोरक्ष भापकर यांनी केले. आण्णासाहेब मोरे यांनी आभार मानले. यावेळी स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थी गुणदर्शन कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गायन, वादन आदी कलाविष्काराने उपस्थित भारावून गेले. बक्षिसांचा वर्षाव करीत पालक, ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना दाद दिली. मेघराज बजाज यांनी चार हजारांहून अधिक रकमेची    बक्षिसे दिली