Breaking News

खर्डा येथे शिंदेच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन


जामखेड ता/प्रतिनीधी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे शिर्डी हैदराबाद राज्य महामार्गावरील खर्डा बस स्थानक येथे गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी भगवान बाबा भक्त मंडळ व समाज बांधवांच्या वतीने राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन करून विटंबना करणार्‍या अहमदनगर येथील स्वप्नील शिंदे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येऊन दोषीवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन भक्त व समाज बांधवांच्या वतीने जामखेड सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण यांना देण्यात आले.
यावेळी सरपंच संजय गोपाळघरे, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, भाजप तालुका युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. प्रविन सानप, उपसरपंच संजय सुर्वे, माजी सरपंच शिवकुमार गुळवे, माजी उपसरपंच भागवत सुरवसे, माजी उपसरपंच मदन पाटील, चेअरमन नानासाहेब गोपाळघरे, गणेश डाडर, विकास शिंदे, बाबासाहेब चौधार, बळीराम दराडे, महालिंग कोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, अ‍ॅड. सुभाष जायभाय, डॉ. जयराम खोत, डॉ. सोपान गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, दत्तात्रय गोपाळघरे, भीमराव गोपाळघरे, नवनाथ गोपाळघरे, ओंकार बारगजे, गोविंद खाडे, तात्याराम होडशीळ, माहलिंग कोरे, तुळशीदास गोपाळघरे, दीपक होडशीळ, रोहिदास केकान उपस्थित होते.

यावेळी स्वप्नील शिंदे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून शिर्डी हैदराबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. पोलिस बंदोबस्त चोख करण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार न घडता निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी समाज बांधवांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत घोषणा देत संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.