Breaking News

आंदोलनाचा इशारा देताच खडकवाडीला टँकरच्या खेपा वाढवल्यापारनेर/प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील मौजे खडकवाडी गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या टँकरच्या खेपा 4 जानेवारी पर्यंत वाढवून मिळाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे नेते रोहन आंधळे, युवकचे तालुका प्रवक्ते राजु रोकडे या शिष्टमंडळाने चार दिवसांपूर्वी पारनेरच्या तहसीलदारांना लेखी निवेदन देऊन दिला असता त्याची महसुल प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन टँकरच्या खेपा वाढवल्या आहेत.

खडकवाडी गावची लोकसंख्या साडे चार हजार असुन या गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा पंधरा हजार लिटरचा एक टँकर सुरू होता. परंतु एका टँकरने संपुर्ण गावाला पुरेसा पाणी पुरवठा होत नव्हता. त्यामुळे गावातील भुमिपुत्र शेतकरी संघटनेचे राजु रोकडे यांनी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारनेरचे तहसीलदार गणेश मरकड यांना प्रत्यक्ष भेटुन लेखी निवेदन देऊन टँकरच्या खेपांमध्ये वाढ करावी अशी मागणी केली होती. या मागणीनुसार चार जानेवारी पर्यंत टँकरच्या खेपा वाढवून न मिळाल्यास पाच जानेवारीला खडकवाडी ग्रामपंचायत समोर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता. याची गांभीर्याने दखल घेत 31 डिसेंबर रोजीच गावामध्ये दोन टँकर पाठवण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत भुमिपुत्र शेतकरी संघटनेच्या विशेष प्रयत्नांसाठी पदाधिकार्‍यांना धन्यवाद हि दिले .