Breaking News

डॉ. तांबे यांचा वाढदिवस मैत्रीदिन म्हणून साजरा


संगमनेर/प्रतिनिधी. पुरोगामी विचारांचे पाईक व जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ.सुधीर तांबे यांच्या वाढदिवसानिमीत्त हार-तुरे न आणता नागरिकांनी व क ार्यकर्त्यांनी सामाजिक जाणीव ठेवून पुस्तक भेट देवून पुस्तक मैत्री दिन म्हणून सर्वांनी साजरा करावा, असे आवाहन जयहिंद युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

 संगमनेर येथील आ. डॉ.सुधीर तांबे यांनी नगराध्यक्ष, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष ते विधानपरिषद सदस्य या काळात निरोगी समाज निर्मीतीचे कार्य हाती घेतले. आ. बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली जयहिंद युवा मंचच्या माध्यमातून राज्यभर युवकांची मोठी फळी निर्माण केली. सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले. अंध, अपंग, मुक बधीर, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम केले. नेता नव्हे मित्र अशी ओळख आपल्या कार्यकतृत्वातून त्यांनी निर्माण केली. म्हणून पुस्तकप्रेमी असलेले आ.डॉ. तांबे यांचा वाढ दिवस पुस्तक मैत्रीदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हार, गुच्छ, शाल व फेटे यांचा काहीही उपयोग होत नाही. मात्र पुस्तकांचा सामाजिक उपक्रमांसाठी उपयोग होतो. शहरातील व तालुक्यातील ग्रंथालये, शाळा यांना ही पुस्तके भेट म्हणून देता येवू शकतील. आ.डॉ. तांबे हे अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त    त्यांना पुस्तक भेट दिल्यास त्यांच्या सामाजिक उपक्रमांना आणखी चालना मिळेल. तसेच नगरपालिकेच्यावतीने स्वच्छता अभियान सुरु असून हार, गुच्छांचा वापर न केल्यामुळे    नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानातही मदत होणार आहे.