Breaking News

करंजी-नऊचारी रस्त्याचे भाग्य उजाळणार ग्रामस्थांकडून आ.कोल्हेंचा सत्कार


कोपरगाव/प्रतिनीधी
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बाजाराचे गाव असलेल्या करंजी गावाला जाणार्‍या नऊचारी ते करंजी या तीन किमी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. ग्रामस्थांची अनेक वर्षा पासुनची हा रस्ता दुरुस्त करावी अशी मागणी होती. ग्रामस्थांची ही मागणी लक्षात घेऊन आ. स्नेहलता कोल्हे यांनी या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मान्यता मिळवून दिल्याबद्दल करंजी ग्रामस्थांच्या वतीने आ. स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.

राज्य मार्ग 65 ते करंजी या 2.82 किलो मिटर रस्त्यासाठी 1 कोटी 41 लाख 70 हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. तालुक्याच्या पूर्व भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या रस्त्यांच्या कामामुळे परिसरातील गावांचे विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबणार आहेत. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्‍नात आ.कोल्हे यांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे. करंजी गावच्या पाणी पुरवठ्यास होणारा विजेचा व्यत्ययही आ.कोल्हेंच्या प्रयत्नाने सुरळीत होऊन चोवीस तास विज उपलब्ध झाली. करंजी गावासाठी सभागृह दिले त्याचे कामही लवकरच सुरु होणार आहे. साईबाबा संस्थानचे विश्‍वस्थ बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व विचाराने ग्रामविकासाच्या योजनांवरच आमचा भर असल्याचे करंजी चे उपसरपंच रविंद्र आगवन यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक दत्तु नाना कोल्हे, संजीवनी कारखान्याचे संचालक भास्कर भिंगारे, उपसरपंच रविंद्र आगवन, सरपंच छबु आहेर, तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष भिंगारे , डॉ.सुनिल देसाई, लक्ष्मण शेळके, नवनाथ आगवन, अनिल डोखे, रघुनाथ भिंगारे, नामदेव अरखाडे, दादा भिंगारे, देविदास भिंगारे, सोमनाथ फाफाळे, शिवाजी करंजकर, बाळासाहेब भिंगारे आदी उपस्थित होते.