Breaking News

राज्यात चारा छावण्या त्वरीत सुरू करा ः भूमिपुत्र शेतकरी संघटनापारनेर/प्रतिनिधी  
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने पारनेर तालुक्यांसह राज्यात चारा छावण्या तात्काळ सुरू कराव्यात, कांदा जीवनावश्यक वस्तुमधुन वगळुन त्यास ऊत्पादन खर्चावर आधारित प्रती किलो किमान 20 रू हमीभाव द्यावा. अशा विविध मागण्यांसाठी, पारनेर तहसील कार्यालयावर सोमवार दि. 7 जानेवारी पासून मागण्या मान्य होईपर्यंत जागरण गोंधळ व बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.  
      पारनेर तालुक्यांसह राज्यात 212 तालुक्यांमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे गंभीर दुष्काळ आहे. तशी घोषणाही सरकारने केलेली आहे. दुष्काळांमुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्‍न शेतकर्‍यांच्या समोर आहे. दावनीला बांधलेले जनावर जगवायची कशी अशा चिंतेत शेतकरी आहे. तसेच शासनाच्या चुकीच्या धोरनांमुळे कांदा ऊत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या समस्यांवर ऊपाय योजना करण्यात याव्यात. असे अनेकदा लेखी स्वरूपाचे निवेदन मा. महसुल मंत्री चंद्रकांत दादा पा. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले होते. पण अद्यापपर्यंत कोणत्याच प्रकारच्या ऊपाययोजना होताना दिसत नाही. यांच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तहसिल कार्यालयावर जागरण गोंधळ व बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे पा. यांनी दिले आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे प्रदेश ऊपाध्यक्ष असिफ शेख, प्रदेश कार्यकारणी सदस्य निलेश तळेकर, अशोक आंधळे, संतोष कोरडे, संतोष वाडेकर, संतोष हांडे, रोहन आंधळे, राघुजी राऊत, रावसाहेब झांबरे, सचिन सैद, सुमित गाढवे, गणेश सुपेकर, भाऊसाहेब वाल्हेकर, शिवनाथ औताडे, नितीन बुरके, शरद आहेर, माऊली गागरे, बाळासाहेब वाळुंज, राजेंन्द्र रोकडे, अर्जुन रोकडे,  संजय भोर, महेंद्र पांढरकर, संदिप जाधव, संतोष वाबळे, संतोष गागरे, मंजाबापु वाडेकर, संदिप व्यवहारे, दादाभाऊ शिंदे, नंदु साळवे, नंदन भोर, रवी ढोकळे, शुभम टेकुडे, पांडुरंग पडवळ, सतिश तनपुरे, संदिप शिंदे, संजय बेंद्रे ,आदी असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.