Breaking News

राम कथेच्या समाप्तीनंतर पूर्णाहुति यज्ञअहमदनगर/प्रतिनिधी
राधा-कृष्ण सेवा समितीच्यावतीने चालू असलेल्या श्री राम कथेच्या समाप्ती नंतर शहरातील खाकीदास बाबा मठात पूर्णाहुति यज्ञ पार पडले. तर भाविकांसाठी भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यजमान निर्मला मालपाणी, मदनलाल मालपाणी, गंगाबिशन चड्डा, वीरा चड्डा, प्रदिप पंजाबी, स्विटी पंजाबी, दिनेश बत्रा, जसपाल नारंग, के.के. शेट्टी, विरेंद्र ओबेरॉय, राजेंद्र जग्गी, किशन जग्गी, आगेश धुप्पड, हरिभाऊ डोळसे, मिरा डोळसे, अशोक मवाळ, दिनेश अग्रवाल, डॉ.सुरेश दांगडिया, किशनलाल गुप्ता, अशोक इंगळे, अश्‍विनी कुमावत, सुनिल कुमावत, राधेश्याम शेठी, रतन तलवार, श्यामसुंदर जाखोटीया, कमलेश शेठी, नंदकिशोर खत्री, सागर गुलाटी, गीता नय्यर, धीरजकुमार नय्यर, रिटा गुलाटी, हरीश हरवानी, राजश्री राठी, किट्टी नारंग, ज्योती गुप्ता, विमल इंगळे, लीला दांगडीया, निता नारंग, विना बत्रा, डॉ.मधुसूदन माहेश्‍वरी, सरला माहेश्‍वरी, सुनिता जग्गी, अर्चना लड्डा, मंगल गट्टाणी, राजकन्या सारडा, भारती मालू, सरोज मालू, सुनंदा सारडा, आरती लड्डा, राजकुमारी आसावा, विजय मनोचा, सुजल मालपाणी आदिंसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
नुकत्याच पार पडलेल्या या श्रीराम कथा सप्ताहाला नगर मधील भाविकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. युगल शरण महाराज यांनी कथेचे निरुपम करताना रामायणातील विविध घटना आपल्या वाणीतून जीवंत केल्या. तर या घटने मागील धार्मिक आशय स्पष्ट केला. कथाप्रसंगी विविध घटनांवर आधारित झांकी साकारण्यात आल्या होत्या. या झांकीचे दर्शन भाविकानी घेतले.