Breaking News

पाथर्डीत किरकोळ कारणातुन गोळीबार

पाथर्डी प्रतिनिधी, अभिजीत खंडागळे : शहरातील शेवगाव रोडवरील हॉटेल श्रद्धामध्ये थर्टी फस्टच्या रात्री ११.४५ ते १२.१५ वाजण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात वाद होऊन बंदुकी सारख्या शस्त्राने हवेत गोळीबार केला असून पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये ६ जणावर दत्तात्रय उर्फ बबलू कांबळे यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या मारहाणीत दत्तात्रय उर्फ बबलू कांबळे यांच्या डोक्याला मार लागला असून पुढील उपचारासाठी त्याला अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.तसेच समोरील युवक ही या वादात जखमी झाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.


याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की,बबलू कांबळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,थर्टी फस्टच्या रात्री हॉटेल श्रद्धा मध्ये मी जेवण करत होतो.त्यावेळी संतोष गायकवाड,सोनू मणियार, सोहेल मणियार,पांडू भांडकर,आशिष दानापुरे व एक अल्पवयीन युवक हॉटेल मध्ये आले असता त्यांना जेवायला या असे म्हटले त्यावरून तू खूप जेवणारा झाला असे म्हणत वरील लोकांनी मला लाथाबुक्यांनी मारहाण करत त्याच्या कडील बंदुकी सारख्या शस्त्राने हवेत गोळीबार केला असल्याची फिर्याद दिली असून वरील सहा जणाविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनकर मुंडे, हवालदार अरविंद चव्हाण,संजय आव्हाड,रांजणे यांनी अहमदनगर येथील हॉस्पिटलमध्ये जावून फिर्यदिचा जवाब नोंदवला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करत आहेत.सदरील गुन्ह्यात पोलिसाच्या अंदाजानुसार एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समजते.तर यातील किती आरोपीं हे अल्पवयीन आहेत हे वरील ६ आरोपीना ताब्यात घेतल्यानंतरच निष्पन्न होणार असल्याचे पोलिसांचे मत आहे.