Breaking News

रस्ते अनुदान योजनेंतर्गत डांबरीकरणाचा शुभारंभ


शेवगाव/प्रतिनिधी
शहरात नव्याने व वेगाने विस्तारीत होत असलेल्या प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांचे मुलभूत प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत या प्रभागात सुमारे 45 लाख रुपयांची विविध विकास कामे मार्गी लावली असून यापुढील काळातही प्रभागातील विकास कामासाठी कटिबध्द राहू, असे प्रतिपादन या प्रभागाचे नगरसेवक सागर फडके यांनी केले.

नगरपरिषदेच्या रस्ता अनुदान योजनेतून प्रभाग क्रमांक 16 मधील सुमारे 30 लाख रुपये खर्चाच्या वरूर रोड कमान ते साईनगर व वरूर रस्ता ते श्रीराम कॉलनी व साईमंदिर या दोन रस्त्यांच्या डांबरीकारण कामाचा शुभारंभ रमेश कुंभारकर व विजय जोशी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महेश फलके, अशोक आहुजा, आनंद जगदाळे, संतोष व्यवहारे, संदीप राठोड, दत्तात्रय देहाडराय, संतोष नाईकवाडी, माधव काटे, वल्लभ लोहिया, रवी सुरवसे, दत्तात्रय फुंदे, संपत नेमाने, गणेश डोमकावळे, फुलचंद रोकडे यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी फडके म्हणाले की, या प्रभागात असणार्‍या विखे इंग्लिश मेडीयम मधील विद्यार्थी पालक व नागरिकांची रस्ता डांबरीकरणामुळे चांगली सोय होणार आहे. या कामासाठी स्वीकृत महेश फलके यांनी त्यांच्या निधीतून 5 लाख रुपये दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत आहोत. सध्या येथे 6 इंची पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरु असून लवकरच वरूर रोड कमान ते वडार गल्ली रस्त्याच्या बाजूने एलईडी दिवे बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.