Breaking News

रामदास स्वामी संस्थानतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन


परळी (प्रतिनिधी) : सज्जनगड येथील श्रीरामदासस्वामी संस्थानतर्फे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रौढ गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 


कन्याशाळा सातारा येथे होणार्‍या या स्पर्धेत इयत्ता पहिली व दुसरीच्या गटामध्ये शनिवार 2 फेब्रुवारी रोजी भीमरूपी मारूती स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर इयत्ता तिसरी ते चौथीच्या गटासाठी रविवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी रामरक्षा पठण स्पर्धा, पाचवी ते सहावी गटासाठी शनिवारी 2 फेब्रुवारी रोजी मनाचे श्‍लोक 1 ते 15 लेखन स्पर्धा (वेळमर्यादा 30 मिनिटे ), सातवी ते आठवी गटासाठी रविवारी 3 फेब्रुवारी रोजी कथाकथन (समर्थ चरित्रातील कथा) (वेळ 3 मिनिटे), इयत्ता नववी व दहावी गटासाठी शनिवारी दोन फेब्रुवारी रोजी समर्थ चरित्रावर लेखी प्रश्‍नमंजुषा (वेळ 30 मिनिटे ), महाविद्यालयीन व खुला गट याकरिता निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.


तसेच या सर्व स्पर्धांना विनामूल्य प्रवेश असून या स्पर्धेसाठी 30 जानेवारीपूर्वी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर (मो. 94037 03641), 


श्रीरामदासस्वामी संस्थान सज्जनगड सातारा कार्यालय (02162-230401) येथे संपर्क साधावा.