Breaking News

ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळेच अक्षय प्रकाश योजनेची सुरूवात : काकडे
चापडगाव : कुठल्याली योजनेला पाठपुराव्यामुळेच यश मिळत असते. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे अक्षय प्रकाश योजना आज कार्यान्वित होत असल्याचे मत लाडजळगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांनी व्यक्त केले. 
गोळेगाव येथील शिववस्तीमध्ये अक्षय प्रकाश योजेच्या कामांचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी काकडे बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  भाऊसाहेब भोंडे हे होते. कार्यक्रमास जगन्नाथ गावडे, संजय आंधळे, माणिक गर्जे, मुक्ताताई आंधळे, विजय साळवे, भाऊसाहेब सातपुते, शंकर काटे, किशोर दहिफळे, भाऊसाहेब मासाळ, नवनाथ खेडकर, अंबादास ढाकणे, बाळासाहेब फुंदे, भागवत रासनकर हे उपस्थित होते. 
यावेळी बोलतांना काकडे म्हणाल्या की, या योजनेचे काम यापूर्वीच झाले असते. परंतू ही योजना पूर्ण होऊ नये, तिला मंजुरी मिळू नये म्हणून या विकास कामात अडथळा आणण्याचे काम आमदार पुतना मावशीने केले आहे. जर तुमच्याने काम होत नसेल तर त्या कामात तुम्ही अडथळा देखील आणू नये. राजळे कुटुंब नेहमी या भागाचे आमदार राहिले. जे काम आमदारांनी करायचे ते आम्हाला करावे लागत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना सुद्धा तालुक्यात विकास कामांची गती मंद झाली आहे. या योजनेसाठी सर्वांनी एकत्र येऊन जसा पाठपुरावा केला. तसाच पाठपुरावा आपल्याला गोळेगावचे धरण होण्यासाठी करायचा आहे. स्वातंत्र्यापासून पहिल्यांदाच बर्डे वस्ती व  शिववस्ती अक्षय प्रकाश योजनेने प्रकाशमय झाल्या आहेत. तर जोतीबा वस्तीला देखीळ प्रकाशमय करण्याचे काम लवकरच करणार आहोत. तुमच्या चेहर्‍यावरील आनंद हीच आमच्या कामाची पावती आहे. आणि या आनंदाने अजून काम करण्याची ताकद व ऊर्जा मला नेहमी मिळते असेही त्या बोलताना म्हणाल्या.
यावेळी विठ्ठल ढाकणे, वसंत वीर, मुन्नावर शेख, संजय दहिफळे, वसंत बर्डे, डॉक्टर बोडखे, संजय मराठे, नवनाथ फुंदे, पांडुरंग बर्डे, अशोक बर्डे, बापूसाहेब बर्डे,जनार्दन बर्डे, शिवनाथ बर्डे, जगन्नाथ रासनकर, महादेव बर्डे, सखाराम बळे, दिलीप मोरे, राम काटे, अनिल शिंदे, जालिंदर बर्डे तसेच परिसरातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी संजय आंधळे, जगन्नाथ गावडे, भाऊसाहेब सातपुते, माणिक गर्जे, किशोर दहिफळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण सानप तर आभार शिवनाथ बर्डे यांनी मानले.