Breaking News

11 एकरमध्ये रेखाटणार जगातील सर्वात मोठी रांगोळी


शैलेश शिंदे
कोपरगाव :  सातवीत शिकणार्‍या आपल्या मुलीचं जगातील सर्वात मोठी रांगोळी काढण्याचं स्वप्न साकारण्यासाठी बापाने आपलं सर्वस्व पणाला लावल आहे. कोपरगाव येथील सातवीत शिकणारी सौंदर्या बनसोड हिस जगातील सर्वात मोठी रांगोळी रेखाटण्याचे तिचे स्वप्न होते, आता हे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. या महाकाय रांगोळीची सुरूवातही तिने केली आहे.

11 एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांची पुर्णाकृती रांगोळी ती रेखाटत आहे. जवळपास वीस दिवस ती अथक परिश्रम करून हि रांगोळी साकार करत आहे. येत्या काही दिवसांत म्हणजेच शिवजयंतीच्या दिवशी ती जगातील सर्वात मोठी रंगोळी काढून विश्‍वविक्रम करणार आहे. यासाठी तिचे आई वडील तिला मदत करत आहेत. सर्वसामान्य परिस्थिती असतानाही सुमारे वीस ते तीस लाख रूपये खर्चून हि रांगोळी साकारली जात आहे. आजपर्यंत रेकॉड आहे की, चार लाख स्केअर फुटाच्या क्षेत्रात रांगोळी काढत असलेली छत्रपतींची रांगोळी तब्बल साडेचार लाख स्केअर फुटाची असणार आहे. यासाठी तिच्या आई वडीलांनी आपलं सर्वस्व पणाला लावल आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या 14 व्यावर्षी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला होता. तसाच तिनेही छत्रपतींची सर्वात मोठी विक्रमी रांगोळी काढण्याचा निर्धार केला आहे. सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सौंदर्या वीस दिवसात हि भव्य रांगोळी साकारणार आहे. जगातील सर्वात मोठी रांगोळी काढण्याचा ध्यास या मुलीने घेतला आहे.19 फेब्रुवारी रोजी छत्रपतींना जयंतीच्या दिवशी हेच खरं अभिवादन ठरेल.