Breaking News

13 फेब्रुवारी रोजी येवला येथे शरीरसौष्ठव स्पर्धा


अहमदनगर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी राजे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर नाईकवाडे पाटील व संजय सुरवसे यांच्या पुढाकाराने अ.नगर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डर्स व फिटनेस असोसिएशन आणि नाशिक बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने बुधवार दि. 13 फेब्रुवारीला येवला (जि.नाशिक) येथे भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन शनी पटांगण, येवला, जि.नाशिक येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा एकूण 6 वजनी गटात होणार असून, प्रत्येक गटात पहिल्या चार क्रमांकास रोख रु. 1 हजार, रु.700, रु. 500 व रु.300. पाचव्या क्रमांकास ट्रॉफी, सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

‘छत्रपती श्री’ या किताब विजेत्यास रुपचंद भागवत (शिवसेना उपसभापती, पंचायत समिती) यांच्यातर्फे रोख 11 हजार रुपये, बेस्ट पोजर यास कृष्णा एजन्सीचे चेअरमन सम्राट वर्मा यांच्याकडून रोख 7 हजार रुपये व मोस्ट इंम्प्रुव्ह्युड बॉडी बिल्डरला रोख 5 हजार रुपये, स्मृतीचिन्ह, मानाचा बेल्ट, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष महेश सातपुते, उपाध्यक्ष विक्रम भोगाडे यांनी केले आहे.