Breaking News

राष्ट्रीय महामार्ग 222 चे रखडलेले काम महिनाखेरीस सुरु होणार - नन्नवरेखरवंडी कासार/प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग 222 चे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहे ते पूर्ण होईल का नाही ? याबाबत शाशंकता होती परंतू लवकरच महामार्गावरील वाहतूक सुसाट धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे काम मुंबई येथील जेडीसीएल कंपनी व पुणे येथील आरबीके कंपनी यांनी संयुक्तरीत्या घेतले होते परंतू, त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे हे काम रखडले या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. कंत्राटदारांनी स्थानिक लोकप्रतिनिधीं यांनी कमिशन मागितल्याने काम बंद केल्याचे सांगितले तर हे कामच निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचा ठपका माजी कंत्राटदारांवर ठेवण्यात आला. यासर्व गोंधळात मात्र महामार्गाचे काम रखडले गेले व रस्ता पुन्हा वाहतुकीच्या दृष्टीने धोक्याचा बनला दरम्यानच्या काळात मोठे अपघात या महामार्गावर झाले आता पुन्हा नव्याने फेब्रुवारी महीनाखेरपर्यत इ-टेंडर खुले होऊन नविन कंञाटदारामार्फत या महामार्गाचे काम सुरु होणार असल्याची माहिती उपअभियंता बाळासाहेब नन्नवरे यांनी दिली आहे. यामधे 222 महार्गावरील रखडलेले काम पुल दुरुस्ती खड्डेभरण इत्यादी कामाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्गाचे पुन्हा पुनरुज्जीवन होते की येरे माझ्या मागल्या अशी परीस्थिती ऊदभवते याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.