Breaking News

उत्तर प्रदेशसह तीन राज्यांमध्ये विषारी दारूचे 28 बळी


लखनऊ : उत्तर प्रदेशसह बिहार आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारूने तब्बल 28 जणांचा बळी घेतला आहे. विषारी दारूमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने उत्तरेत हाहाकार माजला आहे. उत्तर प्रदेशात विषारी दारू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, बिहार आणि उत्तराखंड राज्य सरकारकडूनही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील देवबंद परिसरात विषारी दारू पिल्याने 5 जणांनी प्राण गमावला. 10 लोकांची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात विषारी दारू प्राशन केल्याने 9 लोकांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. एका उत्पादनशुल्क अधिकार्‍यासह चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. उत्तराखंडमधील रुरकीमध्ये विषारी दारूने 7 लोकांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा 12 पर्यंत पोहोचला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर घेत 13 अधिकारी आणि कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे.