Breaking News

घन कचर्‍यापासून वीज निर्मिती प्रकल्प : महापौर


अहमदनगर/प्रतिनिधी : नाशिक महापालिकेने अंबड परिसरात उभारलेल्या घनकचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घेऊन अशा प्रकारचा प्रकल्प नगरमध्ये उभारता येईल का?, याबाबत उपस्थित अधिकारी व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली.

यावेळी महापौर श्रीमती रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, प्रकल्प अधिकारी बाजीराव माळी, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष तुषार पोटे, युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य पुष्कर कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

नाशिक येथे भारतीय जनता पक्षाच्या बैठकीसाठी महापौर बाबासाहेब वाकळे आले असता त्यांनी नाशिकच्या महापौरांची व उपमहापौर यांची भेट घेतली. या भेटीत घनकचरा प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर असल्यामुळे अशा प्रकारचा प्रकल्प नगर शहरात उभारता येईल का? याबाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली. “अहमदनगर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी व घनकचरासंबंधी आरोग्य अधिकारी, उपमहापौर, नगरसेवक, नगरसेविका, आरोग्य अधिकारी व घनकचरा व्यवस्थापन अधिकारी यांना घेऊन नाशिक व इंदौर महानगरपालिकेचा दौरा करणार आहे’’, अशी माहिती महापौर श्री. वाकळे यांनी दिली.