Breaking News

फरार आरोपी रोहिदास पाबळे पोलिसांच्या ताब्यात


पारनेर/प्रतिनिधी: चार वर्षांपूर्वी पसार झालेला खुनी हल्ल्यातील आरोपी रोहिदास बाबुराव पाबळे (रा.पिंपरी कावळ) यास पोलिसांनी टाकळी हाजी परिसरातूनसापळा लावून अटक केली.

निघोज- देवीभोयरे रोडवरील हॉटेल मंथन मध्ये सुनिल पवार यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये रोहीदास पाबळे यांचे नाव होते. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील व सहायक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसनिरीक्षक बाजीराव पोवार यांनी फरार आरोपी पाबळे हा टाकळी हाजी व शिरूर परिसरात येणार आहे असे समजलेल्या गुप्त बातमीद्वारे नाईक अरविंदभिंगरदिवे, पोलीस नाईक विनोद बोरगे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कावडे , महेश आव्हाड , दत्ता चौगले यांचे पथक तयार करून परिसरामध्ये पाठवले. याठिकाणीसापळा रचून ताब्यात घेतले. पुढील तपास व्ही.एस. बोत्रे करत आहेत.