Breaking News

गोळेवाडी येथे ज्ञानेश्‍वरी पारायणास प्रारंभ


सज्जनगड (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील मौजे गोळेवाडी (गजवडी, बळीपवाडी) येथे ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पारायण सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रमात पहाटे चार ते सहा या वेळेत काकड आरती, सकाळी आठ ते 11 ज्ञानेश्‍वरी वाचन. दुपारी तीन ते पाच ज्ञानेश्‍वरी वाचन, सायंकाळी साडेसात वाजता हरिपाठ, रात्री 9 ते 11 कीर्तन, 11 ते रात्री एक वाजेपर्यंत जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. दरम्यान, पारायण सोहळ्यात मारुती महाराज निगडीकर, सुदर्शन महाराज नलावडे, पावशे महाराज (आळंदी), सोमनाथ गायकवाड महाराज (वाठार किरोली), उमेश किर्दत महाराज (चिंचणेर), संतोष ढाणे महाराज (पाडळी) प्रविण शेलार महाराज (आंबेघर), राम कदम महाराज (डबेवाडी) यांच्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे. पारायणानिमित्त श्रीधर कंग्राळकर, ज्ञानेश्‍वर वांगडे (भाई), चंद्रकांतदादा वांगडे महाराज (नित्रळ) यांच्या हस्ते दीपोत्सव करण्यात येणार आहे. रविवार, दि. 17 रोजी दुपारी 12 ते दोन या वेळेत काल्याचे कीर्तन व दुपारी तीन ते पाच या वेळेत दिंडी सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी या हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.