Breaking News

शेतकर्‍यांच्या विकासासाठी जिल्हा बँक कटीबध्द : घार्गेवडूज, (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक कटीबद्ध असून शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी, असे आवाहन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खटाव शाखेच्यावतीने थेट कर्ज योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) चे वितरण करण्यात आले. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, संचालक प्रदिप विधाते, सरव्यवस्थापक एम. व्ही. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.घार्गे पुढे म्हणाले, शेतकर्‍यांची सर्वकष प्रगती व्हावी जिल्हा बँकेने शेतकरी हित एवढेच ध्येय समोर ठेवून विविध योजना राबविल्या. त्यास शेतकरी वर्गाचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बँकेच्या पदाधिकार्‍यांसह व्यवस्थापनाने कायम शेतकर्‍यांच्या प्रगतीला प्राधान्य दिले आहे. सर्व स्तरातील शेतकरी बांधवांना प्रगतीचे दालन खुले झाले आहे. शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. यावेळी संभाजी शामराव देशमुख (धारपुडी) , विजय ज्ञानदेव घोडके (शेनवडी) या दोन कर्जदारांनी सह्याद्री कारखान्याशी करार करून एक कोटी 25 लाख रूपये किंमतीचे मशिन घेण्यासाठी कर्ज घेतले. या ऊस तोडणी यंत्राचे मान्यवरांच्या हस्ते संबंधितांना वितरण करण्यात आले.
यावेळी विभागीय विकास अधिकारी यु.के. देशमुख, विकास अधिकारी जे. वाय. गोडसे, शाखाप्रमुख धैर्यशिल फडतरे, नगरसेवक अभय देशमुख, बी. एस. देसाई, एस. आर. खाडे, कारंडे, शिंगाडे, अहिवळे, जाधव, काटकर, राऊत आदी उपस्थित होते.