Breaking News

आवारवाडीत शिवसेनेची शाखा स्थापन


पुसेगाव (प्रतिनिधी) : शिवसेनेची बांधीलकी सत्तेशी नसून जनतेच्या प्रश्‍नांशी आहे. रस्त्यावरचा संघर्ष शिवसेनेला नवा नाही. येणाऱया विधानसभा निवडणुकीत विरोधकांना गाडून शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज रहा. आगामी प्रलंबित प्रश्‍न सोडवण्यासाठी शिवसेनेचे लढाऊ नेतृत्व प्रताप जाधव यांना साथ द्या, असे मत शिवसेना खटाव तालुकाप्रमुख दिनेश देवकर यांनी केले.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रचाराला आवारवाडी येथे शाखा शुभारंभाने सुरवात झाली. गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हे अभियान जिल्ह्यात प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात आहे. त्याच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. यावेळी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते प्रताप जाधव, आवारवाडीचे कट्टर शिवसैनिक मुगटराव कदम, खटाव तालुका प्रमुख दिनेश देवकर, रामभाऊ जगदाळे, आमीन आगा, महिपती डंगारे, आकाश जाधव, सुरज जाधव व मोठया संख्येने
ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव म्हणाले, आगामी विधानसभा पूर्ण ताकदिने लढवणार आहे. खटाव उत्तरच्या स्वाभिमानासाठी रिंगणात उतरणार आहे. कारण हा भाग कायमच दुर्लक्षित असून विकासकामांपासून तो वंचित राहिला आहे. रोजगारासाठी युवावर्गास बाहेर जावे लागत आहे, आता जागृत होण्याची गरज असून एकसंघ होऊन आपले प्रश्‍न मार्गी लागतील. पिढयान्पिढया दुष्काळी परिस्थिती, बेरोजगारी यामुळे हा भाग त्रस्त झाला आहे.

निवडणुका आल्या की अमिषाला बळी पडू नका, थोडयाच दिवसात जिहे कठापूर पाणी प्रश्‍न मार्गी लागतोय, हा भागही या योजनेत सहभागी होण्यासाठी आपण आपण प्रयत्नशील राहू, यासाठी शिवसेनेला संधी द्या, असेही ते म्हणाले.