Breaking News

वसना योजनेच्या पाण्याने ग्रामस्थ, शेतकरी सुखावले


वाघोली (प्रतिनिधी) : आसनगाव (माळ) येथे वसना वांगना टप्पा क्र.1 ला लोकवर्गणीतून वारंवार पाणी येत असल्याने परिसरातील गावकरी, शेतकरी सुखावले आहेत. या प्रकल्पाच्या पाण्याचा फायदा पिंपोडे खुर्द आणि परिसरातील गावांना होत आहे.

ऐन दुष्काळात येथील नागरिकांना पाण्याचा तुटवडा सध्या जाणवत नाही. पिंपोडे खुर्द प्रमाणेच उत्तर कोरेगांव तालुक्यातील राऊतवाडी, सर्कलवडी, अनपटवाडी, वाघोली ही गावे या प्रकल्पाचा उपभोग घेत आहेत. पिंपोडे बु येथील नागरिकांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे या गावाने वाघोली आणि पिंपोडे बु. सीमेवरील वसना नदीतील जल शिवार योजनेअंतर्गत काढण्यात आलेले बंधारे वसना वांगना प्रकल्पातून भरून घेतले तर नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.