Breaking News

जलपूरक शहरीकरणावर भर द्यावा - साळुंके


अहमदनगर/प्रतिनिधी : “पूर्वीची बहुतांश शहरे ही नदीकाठी वसलेली होती. तसेच शहराचे अर्थकारण हे उपलब्ध पाणीसाठा व जलस्रोत यावर अवलंबून होते. या जलस्रोताकडे दुर्लक्ष केल्याने शहरविकासावर आणि आरोग्यावर परिणाम होत आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाचा विचार करताना जलपूरक शहरीकरणावर भर देणे गरजेचे आहे’’, असे मत आर्किटेक्ट रोहित साळुंके यांनी व्यक्त केले.

आर्किटेक्ट इंजिनियर अ‍ॅण्ड सर्व्हेअर्स असोसिएशनच्या वतीने शहरातील मेघनंद लॉन येथे ‘सीना नदी सुशोभीकरणाच्या दृष्टीने विचारमंथन आणि जलपूरक शहरीकरण’ या विषयावर अश्‍वस्थ डिझाईन स्टुडिओचे आर्किटेक्ट रोहित साळुंके, सोनू साळुंके, योगिता कासवा यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सातकर, अनिल मुरकुटे, सलीम शेख, अशोक काळे, प्रदीप तांदळे, विजय पादीर, संजय पवार, अनिल धोकरीया, प्रशांत आढाव, अशोक मवाळ, दीपक मुथा, इक्बाल सय्यद, कैलास ढोरे, संतोष पळसकर, शेखर आंधळे, विनायक मैड, सुरेंद्र धर्माधिकारी आदी उपस्थित होते.