Breaking News

ना.खोतकर,गायकरांच्या शिष्टाईला मिळाले यश;कृषीकन्यांचे आंदोलन स्थगीत,मुलींना सरकार फसविणार नसल्याची अपेक्षा


नाशिक/ प्रतिनिधी-
पुणतांबा येथील कृषी कन्यांच्या अन्नत्याग आंदोलनाकडे व्यवस्थेसह शेतकर्यांच्या प्रश्नांचे भांडवल राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न करणार्या राजकीय नेत्यांच्या हेतूवर लोकमंथनने बोट ठेवल्यानंतर आज सहाव्या दिवशी ना.अर्जून खोतकर यांची शिष्टाई फलदायी ठरून अन्नत्याग आंदोलनाची समाप्ती झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान लोकमंथनचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर कृषीकन्यांना भेटी देणार्या ,आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवून आंदोलक भगीनींचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केलेल्या अनेकांनी लोकमंथनशी संपर्क साधुन कृषीकन्यांच्या भावनांशी सहमती दर्शवली या प्रक्रियेत छावा क्रांती वीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष ,बरखास्त सुकाणु समितीचे सदस्य तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाना बच्छाव,बच्चु कडू यांच्या प्रहारचे प्रकाश चव्हाण यांचा विशेषत्वाने समावेश होता.ना.अर्जुन खोतकर यांच्या शिष्टाईत करण गायकर याःचा सिंहाचा वाटा असून गेल्या तीन दिवसापासून करण गायकर यांनी महसुल मंञी चंद्रकांत दादा पाटील,जलसंपदा मंञी गिरीश महाजन ,अर्जुन खोतकर,अहमदनगरचे जिल्हा प्रशासनाशी सांतत्याने संपर्कात राहून कृषीकन्यांना न्याय देण्यासाठी गळ घातली.जेष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनीही आपल्या काही समर्थकांसमवेत आंदोलक शेतकरी कन्यांची भेट घेतल्याचृ वृत्त आहे.पाच दिवस अन्नत्याग केल्याने अशक्तपणा वाढून प्रकृती खालावलेल्या कृषीकन्यांना शुक्रवारीच अहमदनगर जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते..अखेर पाच दिवसानंतर शासनाला जाग येऊन शासनाचे प्रतिनिधी म्हणून ना.अर्जुन खोतकर यांनी घेतलेला पुढाकार यशस्वी ठरला.शेतकर्यांच्या भावनांशी खेळणारे सरकार आणि विरोधी पक्ष शेतकर्यांच्या मुलींना तरी फसवणार नाही अशी भोळी आशा व्यक्त केली जात आहे.