Breaking News

२१ व्या बौद्ध धम्म परिषद श्रामनेर शिबीराचे आयोजन


माजलगाव : प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा माजलगाव च्या विद्यमाने प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी केसापुरी वसाहत येथे २१ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन दि.२४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. देशातील समाजा मध्ये सामाजिक मानव कल्यानची शिकवण देऊन देऊन बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे परिषदेचे उदघाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितीत राहणार आहेत. या परिषदेस संभोदित करण्यासाठी व विविध विषयांवर मार्गरदर्शन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय वसंत पराड, एम.डी. सरोदे राज्य अध्यक्ष यु.जी.बोराडे हे उपस्थित राहणार आहेत. दिनांक १५ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत श्रामनेर शिबीर व महिला उपासिकाचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेस पूजनीय भन्ते धम्मप्रिय हे धम्मदेशना देणार असून दिनांक २४ फेब्रुवारी सकाळी १० वाजता पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण मानवंदना व धम्म ध्वज वंदना जिल्हा अध्यक्ष विष्णू कांबळे यांच्या हस्ते होणार आहे सकाळी ११ वाजता भीमनागर ते धम्मपरिषद श्रावस्तीनगर केसापुरी वसाहत पर्यंत भव्य रॅली निघणार आहे. सायंकाळी भीमगीताचा कार्यक्रम होणार असून सदरील धम्म परिषदेस सर्व धम्म बंधू भगिणीने तन मन धनाने सहकार्य करून धम्मकार्य करून धम्म कार्य गतिमान करण्यास मदत करावी व धम्म परिषदेस येताना सुभ्र वस्त्र परिधान करून येण्याचे आव्हान तालुका अध्यक्ष भागवत साळवे सचिव गुलाब धाईजे, डॉ. सुहास टाकणखर, यांनी केले आहे या परिषदेसाठी सिद्धार्थ वक्ते, चक्रधर पोटभरे, जिल्हा सचिव एस.बी. मोरे, जिल्हा उपाध्यक्ष के.वि. साळवे, पर्यटन सचिव श्याम भाऊ वाघमारे, जिल्हा संघटिका लीलाताई उजगरे, डॉ. दिगंबर बोराडे, विजय साळवे, कमल ताई डोंगरे, विश्वनाथ जावळे, बाबूलाल घनगव, डी.पी वाघमारे, ज्ञानोबा साळवे, कलिंदा बनसोडे, बाळासाहेब घनगाव, मोहनराव काकडे, एम.डी.गायकवाड, डी.पी.पोटभरे, कमलताई गायकवाड, एन.बी. राजभोज, बी.सी. डोंगरे, रेवताताई कांबळे, आशाताई मोरे, मंदाताई साळवे, वंदनाताई घनगाव, मायाताई स्वामी, कामठाताई भोजने आदी परिश्रम करीत आहेत.