Breaking News

फरार आरोपी गजाआड


जामखेड/प्रतिनिधी
गोळीबार प्रकरणातील एक व पिटा अंतर्गत एक अशा दोन फरार आरोपींना जामखेड पोलिसांनी जेरबंद केले.
एक वर्षांपूर्वी जामखेड पंचायत समिती समोर डॉ. सादिक पठाण व कय्युम शेख यांच्यावर गोळीबार करून जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या (गुन्हा रजि 17/2018 भादवि 307 वगैरे ) गुन्हयातील एक वर्षापासुन फरार असलेल्या करण उर्फ करणसिंग दर्गा भटनागर रा. इंदौर मध्यप्रदेश याला पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार साकत परिसरातील शेतातुन मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली.

तर दूसरा आरोपी (गुन्हा रजि 94/2017 पिटा अंतर्गत) दोन वर्षापासून फरार असलेल्या युसूफ सत्तार शहाला पोलिसांनी दि.11 फेब्रुवारी रोजी नान्नज परिसरातून ताब्यात घेतले आहे. दोन घटनेबाबत दोन वेगवेगळे पथके आरोपींच्या शोधात होते. सदर कारवाई पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, पोलिस उपाधिक्षक सूदर्शन मूंढे, पोलिस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश कांबळे, पो.ना. बाबासाहेब बढे, पो.कॉ. गणेश साने, गणेश गाडे, दत्तू बेलेकर, श्यामसुंदर जाधव, लोखंडे यांच्या पथकाने केली.